Monday, November 07, 2005

एकटा

ही वाट माझी नेहमीची
पण तिनेही आज ऒऴख नाही दाखवली
मी वाट चुकलो हे कऴलेही असेल
पण तिने त्‍याची दखल नाही घेतली

या पावलांनी मला सदैव साथ दिली
माझी चुकलेलि वाट त्‍यांनाहि नाही कऴली
की मला अडखऴलेला बघुन
त्‍यांनीही माझ्‍याशी फारकत केली

या डोऴ्‍यांनी मला नेहमी आशेचा किरण दाखविला
मग नैराश्‍याच्‍या अंधाराची त्‍यांना चाहुल नाही लागली
की कदाचीत या काऴोखाच्‍या भीतीने
त्‍यांनीही पापणी मिटुन घेतली